मी रेश्मा पाटील. मी श्री क्लासेस मध्ये इयत्ता नववी पासुन आहे.मला क्लास मधील प्रत्येक शिक्षकांकडुन खुप चांगल्या प्रकारचे शिक्षण प्राप्त झाले.क्लास मधील प्रत्येक शिक्षक अनुभवी आहेत त्यामुळे ते मुलांना समजवून शिकवतात ही आणि याच्या व्यतरीक्त मुलांना पुस्तकी शिक्षणासोबतच त्यांनी भविष्यात जे ध्येय ठरवल आहे ते कशाप्रकारे त्यांनी साध्य केल पाहीजे याबद्दल ही माहीती देऊन मुलांना प्रेरीत करत असतात.

क्लास मधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच जे शिक्षक हा चालवतात ते स्वत:हुन क्लास मधील मुलांना शिकवतात. त्यामुळे मुलांना क्लास मध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता भासते व कोणत्या प्रकारे योग्य ते शिक्षण मुलांना प्राप्त होईल याबद्दल शिक्षक योग्य तो निर्णय घेऊ शकतात.तसेच क्लासमधील अप्रतीम गोष्ट म्हणजे दहावी आणि बारावी या दोन इयत्तेच्या मुलांनसाठी क्लास मध्ये वर्षाच्या आखेरी दहावीच्या मुलांच्या पाच व बारावीच्या मुलांच्या तीन परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे सुवर्ण आशी संधी दहवीच्या आणि बारावीच्या मुलांना प्राप्त होते.जेणेकरून ते या संधीचा उपयोग करून या परीक्षांमध्ये उत्तम गुण प्राप्त करू शकतात.आशा परीक्षा घेतल्यामुळे दहावीमध्ये माझाही खुप चांगल्या प्रकारे सराव झाला.

क्लास मध्ये शिक्षणा व्यतरीक्त भरपूर गोष्टी घेतल्या जातात म्हणजेच निबंध ,चित्रकला,खेळ यांच्या स्पर्धा. तसेच क्लासमधील माझे आवडते शिक्षक म्हणजेच प्रविण आणि प्रमोद सर यांच्याकडुन खुप चांगल्या गोष्टी शिकण्यास ही मिळाल्या. प्रविण सर यांच्या शिकवण्याच्या पध्दतीमुळे गणित या सारखा अवघड वाटु लागनारा विषय ही मुलांना कसा सोपा वाटेल आशा प्रकारे सर शिकवतात त्यामुळे मलाही सरांची शिकवण्याची पध्दत खुप आवडते. सरांना त्यांच्या आयुष्यात आलेले आनुभव ते मुलांना नेहमीच सांगत आसतात आणि मुलांना प्रेरणा देतात.

मला आशा आहे की क्लास मधील सर्व शिक्षक आसेच मुलांना शिकवत आणि त्यांच्या आयुष्यात ते एक चांगले व्यक्ती कसे घडतील याबद्दल प्रेरीत करत राहतील .